Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्र्यांनी हात फिरवला नसता तर हे खासदार असते का ? ; ना.गुलाबराव पाटील
    जळगाव

    मुख्यमंत्र्यांनी हात फिरवला नसता तर हे खासदार असते का ? ; ना.गुलाबराव पाटील

    editor deskBy editor deskJanuary 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    राज्यात शिंदे गट व ठाकरे गटात नियमित वाद सुरु आहे. यावर आज खान्देशची मुलुखमैदान तोफ म्हणून ख्याती असलेले शिंदे गटातील नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका कळी आहे.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुसता दाढीवर हात फिरवला असता तर संजय राऊत खासदार झाले नसते. ते आडवे पडले असते,’ असे ते म्हणालेत. गुलाबराव जळगाव येथील हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये बोलत होते. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊतांना 41 मते पडली ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडली आहे म्हणून तर ते निवडून आले आहे. एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता हात ठेवला असता तर आज संजय राऊत खासदार झाले नसते. आडवे झाले असते, संजय राऊत यांच्यावर यापूर्वी याच मुद्द्यावरून गुलाबराव पाटील यांनी हल्लाबोल केला होता. यावेळी गुलाबराव पाटील यांनी मात्र स्पष्टच सूनावले आहे. लव्ह जिहाद संदर्भात स्वतंत्र कायदा करावा यासह विविध मागण्यांसाठी आज जळगावत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांसह विरोधकांवर निशाणा साधला.
    गुलाबराव पाटील म्हणाले की, अनेकजण आमच्यावर टीका करत आहेत, मात्र आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी बाहेर पडलो असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहे.

    गुलाबराव पाटील म्हणाले की, मला खुर्चीपेक्षा माझा धर्म महत्त्वाचा आहे, आधी आम्ही हिंदू आहोत मग मंत्री असे म्हणतानाच खुर्ची आम्हालरा देणारी जनता कधीही खुर्ची काढून घेऊ शकते, त्यामुळे आम्हाला केवळ धर्म महत्वाचा आहे. आमचा धर्म जरी महत्त्वाचा असला तरी आम्ही कुणाच्या धर्माला दुखवत नाही, पण आमच्या धर्माबाबत कोणी वाकडी नजर करत असेल तर मात्र आम्ही त्साला सोडणार नाही, असे म्हणतानाच इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, हे ओवैसीच्या…. सांगितले होते असे आक्षेपार्ह वक्तव्य करत एकेरी टीका केली आहे. ​​​​

    मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पावरा समाजाच्या धर्मांतराचे काम खिश्च्रनांकडून सुरु आहे. आमच्या धर्माकडे कुणी वाकड्या नजरेने बघत असेल तर कुणी सहन करणार नाही. आज मी मंत्री आहे की आमदार आहे, त्यापेक्षा तुमच्यातला हिंदु आहे. खुर्ची देणारे आणि ओढणारेही तुम्ही आहात. खुर्चीपेक्षा धर्म महत्वाचा आहे. इतिहास बघितला तर जैन हे हिंदू आहेत. हिंदू जनजागृती समितीचे पूर्ण भारतभर हे आंदोलन सुरु आहे. जिल्हा प्रशासनाला परवानगी देण्यास सांगितल्याचेही ते म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.