मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसपासून राज्य सरकार व ठाकरे गटात नेहमीच वाद होत आहे. नियमित भाजपकडून किरीट सोमय्या तर ठाकरे गटाकडून संजय राऊत हे आपली बाजू मांडत रोज नवे दावे होत आहे. आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
संजय राऊत म्हणाले कि, राज्य सरकार व्हेंटिलेटरवर असून, त्यात दोन उभे गट पडले आहेत. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, शिवाय, राज्यपाल लवकरच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे सद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली. राजकारण परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. 2024 च्या आधी परिवर्तन होणार. तर डॅमेज कंट्रोलसाठी आधी डॅमेज व्हावे लागते. काही लोक सोडून गेली तर आम्हाला काही फरक पडत नाही, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली.
पुढे ते म्हणाले की, शिवसेना एकच आहे. एकच राहील. गट तट हे तात्पुरते आहेत. बाळासाहेबांनी शिवसेना नावाचा वटवृक्षाचे बीज रोवले. त्या शिवसेनेचे नेतृत्व हे उद्धव ठाकरे करत आहे. त्यांना संपुर्ण महाराष्ट्राचा अशिवार्द आहे. शिवसेना महावृक्ष आहे. महावृक्षाचा पालापाचोळा पडतो. ते लोक उचलून नेतो. पालापाचोळा जाळून त्यांचा वापर शेकोटीसाठी केला जातो. संजय राऊत म्हणाले की, अधिवेशनात अनेक प्रकरणे समोर आली. 6 मंत्र्यांवर भष्ट्राचाराचे आरोप झाले. पुरावे मिळूनही एकावरही कारवाई झाली नाही. पण टीका केवळ विरोधी पक्षावर झाली. आंदोलन करणारी पिढी बदललली पण आंदोलन सुरूच राहतील.