जळगाव : प्रतिनिधी
मागच्या काळात ‘लव्ह जिहादचा’ कायदा सभागृहात आलेला आहे. मुख्यमंत्र्यापर्यत ही मागणी मी करणार आहे. येणाऱ्या अधिवेशनात हा कायदा पटलावर आलेला आहे. हिंदू म्हणून मी याच्यात अग्रेसर असेल तसेच पोलीस प्रशासनाला मी आदेश करतो. कि जिथे चुकीचे काम होत असेल तिथे कारवाई करावी. त्यासोबत धर्मातरबाबत म्हणाले कि आमच्या धर्माकडे कुणी वाकडी नजर करत असेल तर हिंदू म्हणून समोर येवू मला खुर्ची पेक्षा धर्म महत्वाचा असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
हिंदू युवती श्रद्धा वालकरचे आफताबने ३५ तुकडे केल्याचे प्रकरण शांत होता, तोच झारखंड राज्यातील रबिका पहाडन या हिंदू तरुणीचे दिलदार अन्सारीने ५० तुकडे केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच भारत आणखी तुकडे होवू नये यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी जळगाव येथे काढलेल्या ‘हिंदू जनसंघर्ष मोर्च्याच्या द्वारे महाराष्ट्र सरकारकडे कठोर अशा ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मातर’ विरोधी कामांची मागणी करण्यात आली. यासोबतच जिल्ह्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी आणि श्री सम्मेदशिखर हे तीर्थक्षेत्र घोषित करावे, या ही मागण्या करण्यात आल्या. या मोर्चामध्ये महिला अन् युवतीचा मोठा सहभाग होता. या मोर्चासाठी विदर्भासह महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने आलेल्या हिंदूंनी हातात भगवे झेंडे घेऊन ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’चा उद्घोष करत संपूर्ण आज भगवेमय केले होते.
या मोर्चात संत महंत धर्माचार्य, वारकरी संप्रदाय, पुरोहिता बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, स्वामी नारायण संप्रदाय, योग वेदांत सेवा समिती, स्वामी समर्थ संप्रदाय, श्री संप्रदाय स्वामी परिवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राजपूत करणी सेना, हिंदु विधीज्ञ परिषद, रणरागिणी, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या संघटनांसह भाजपा शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे अन् अन्य पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोत रणरागिणी महिला पथक, श्री सम्मेद शिखरजी याचे महत्त्व सांगणारा चित्ररथ, अधिवक्ते, कीर्तनकार, उद्योजक आदी शिस्त पद्धतीने सहभागी झाले होते. शिवतीर्थ येथून छत्रपती शिवरायांच्या स्मारकास वंदन करून निघालेला मोर्चा स्टेडियम चौक, नवीन बस स्थानक, स्वा. सावरकरा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विसर्जित झाला. या वेळी लव्ह जिहादविरोधी तथा धर्मांतरबंदी कायदा करण्याचे, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आणि श्री सम्मेदशिखरजी हे तीर्थक्षेत्र घोषित करण्याचे निवेदन शासनाला सादर करण्यात आले.
‘हातात घेतलेल्या फलकांद्वारे ‘हिंदु युवतींनो लव्ह जिहादच्या षड्यंत्राला बळी पडू नका’, ‘आफताबला फाशी द्या’. ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर’, ‘धर्मांतर हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणा’, ‘आंतरधर्मीय विवाह नोंदणी न्यायालयात करून ते लव्ह जिहाद आहे का? ते तपासा’, ‘लव्ह जिहादची विषवल्ली ठेचा’, ‘लव्ह जिहादसाठी होणान्या अर्थपुरवठा व त्याद्वारे होणाऱ्या आतंकवादी कारवायांची चौकशी करा’, ‘लव्ह जिहाद व धर्मांतर रोखण्यासाठी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करा’ आदी विविध मागण्या करण्यात आल्या. या विषयी घोषणाही देण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. बरसाडेकर महाराज, माहेश्वरी समाजाचे श्री. अशोक राठी, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे श्री. श्रीकांत खटोड, सकल जैन समाजाचे आणि उद्योगपती श्री. अशोक जैन, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.