जळगाव प्रतिनिधी: शहरातील रस्ते बनवण्यासाठी ‘माझी किडनी विका आणि रस्ते तयार करा’, याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील सर्वच रस्त्यांमध्ये खड्डे झालेले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार राजूमामा भोळे यांनी चांगले रस्ते बनिवण्याचे आश्वासन देवून निवडणूकीत निवडून आले त्यानंतर २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली परंतू अद्यापपर्यंत जळगाव चांगले रस्ते झालेच नाही. याबाबत महानगरपालिकेच्या प्रशासनाची लोकप्रतिनिधींशी मिलीभगत असून नगरसेवक कोणत्या ना कोणत्या कारणाने वरून महानगरपालिकेच्या कामांचा ठेका घेतात पण रस्त्यांचे कामे होत नाही. याबाबत वारंवार विचारना केली असता महापालिका प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. दरम्यान जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको भागात २० वर्षांपुर्वी घरे बांधून लाभार्थ्यांना घरे देण्यात आली पंरतू या भागातही रस्त्यांची कामे झालेली नाहीत. दुसरीकडे महानगरपालिकेला शंभर कोटी पैकी ४२ कोटी देऊनही महानगरपालिकेने दिलेल्या कामांकाडे दुर्लक्ष केले जात आहे. जळगाव शहरात अमृत योजना आणि भुयारी गटारी योजनांची कामे करण्यासाठी रस्त्यांवर खोदकाम करून चांगला रस्ता देखील खराब करण्यात आला आहे. याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांना देखील वारंवार तक्रार देऊन फक्त आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचे काम करत आहे. दरम्यान जळगावकर महानगरपालिकेचा कर भरूनही रस्त्यांची सुविधा मिळत नाही. त्यामुळे माझी किडनी विकून जळगाव शहरातील रस्ते तयार करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे माहिती अधीकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी निवेदन देऊन केली आहे.
या निवेदनावर परिमल पटेल, मतीन पटेल, चैतन्य कोल्हे, मंदार कोल्हे, संजय पाटील, सिद्धार्थ सोनाळकर, अमोल कोल्हे ,अनिल नाटेकर, सुरेश पांडे, शिवराम पाटील, किरण ठाकूर, ललित शर्मा, युसूफ पिंजारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत