मुंबई : वृत्तसंस्था
आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. इंधन दरांमध्ये तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. तब्बल सात महिन्यांहून अधिक काळापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. जाणून घेऊया आजचे दर काय?
आजचे कच्च्या तेलाचे दर
आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत घट नोंदवली जात आहे. WTI क्रूड ऑइलची किंमत किंचित वाढ झाल्यानंतर प्रति बॅरल 73.77 डॉलरवर पोहोचली आहे. घसरणीनंतर ब्रेंट क्रूड ऑईल 78.57 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीचा आज भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम झालाय का? जाणून घ्या, तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर.
तेल कंपन्यांना सध्या प्रत्येक लिटर पेट्रोलवर 10 रुपये नफा मिळतोय, असं असूनही कंपन्यांनी दीर्घकाळ किंमती स्थिर ठेवल्यानं त्याचा ग्राहकांना फायदा झालेला नाही. दुसरीकडे डिझेलवर मात्र, तेल कंपन्यांना प्रतिलिटर 6.5 रुपये तोटा सहन करावा लागतोय.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या सरकारी कंपन्यांनी मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल केलेला नाही. त्यांना 24 जून 2022 च्या आठवड्यात पेट्रोलवर 17.4 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर 27.7 रुपये प्रति लिटर तोटा सहन करावा लागला होता.
ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत या कंपन्यांना पेट्रोलवर नफा झाला असला तरी डिझेलवर मात्र तोटा सहन करावा लागत आहे. एप्रिल-मे मध्ये कच्च्या तेलाच्या किमती 103 डॉलरवर पोहोचल्या असतानाही या कंपन्यांनी किमती बदलल्या नाहीत. त्यामुळे त्यांचं त्यावेळी मोठं नुकसान झालं होतं. कच्च्या तेलाच्या किमती जूनमध्ये 116 डॉलरवरून आता 78-79 डॉलरवर आल्या होत्या.
मे महिन्यापासून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण होत असताना सर्वांच्या नजरा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीकडे लागल्या होत्या. पेट्रोल -डिझेलच्या किमतींत घट होणार का? याकडे सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं होतं. पण आजही भारतील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर