मुंबई : वृत्तसंस्था
अजित पवार यांच्या एका विधानामुळे राज्यभर भाजपने आंदोलन करीत निषेध व्यक्त केला होता. त्यावर अजित पवार मी माझ्या वाक्यावर ठाम असल्याची भूमिका घेतल्याने हा वाद वाढत जात होता. मात्र यावेळी अजित पवारांनी लगेचच दिलगिरी व्यक्त केली आहे.
विधानभवनात हिवाळी अधिवेशनात बोलताना अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर असा उल्लेख करण्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं होतं. त्यावरुन राज्यभरात निदर्शनेही झाली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र अजित पवारांची पाठराखण केली आहे. पण आता अजित पवारांकडून पुन्हा वादग्रस्त उल्लेख झाला आहे.
पुण्यातल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माँसाहेब, यांच्याविषयी बोलताना, सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर असा झाला. यावरुन भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली.