Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पतीसाठी जेवणाचा डबा घेवून जाणाऱ्या महिला अपघातात जागीच ठार !
    क्राईम

    पतीसाठी जेवणाचा डबा घेवून जाणाऱ्या महिला अपघातात जागीच ठार !

    editor deskBy editor deskJanuary 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगावात अपघाताची मालिका सुरूच आहे, नियमित कुठेना कुठे अपघात होत आहे त्यामध्ये दुर्दैवाने नागरिकांचा जीव जात आहे. नुकतेच रुग्णालयात दाखल पतीसाठी जेवणाचा डबा घेऊन निघालेल्या पत्नीला काही अंतरावरच मृत्‍यूने गाठले. गावातून बाहेर पडताच पायी चालत असलेल्‍या महिलेला रुग्णवाहिकेने धडक दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी कुसुंबा गावात घडली.
    तालुक्यातील कुसुंबा येथील संगीता कैलास पाटील (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे. संगीता पाटील या पती कैलास लक्ष्मण पाटील, सासू इंदुबाई आणि मुलगा शुभम यांच्यासह कुसुंबा येथे वास्तव्यास होत्या. दरम्‍यान कैलास पाटील यांची प्रकृती चांगली नसल्‍याने त्यांना जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. संगीता पाटील या आज सकाळी साडेआठच्‍या सुमारास सासू इंदुबाई यांच्यासोबत पतीचा जेवणाचा डबा घेवून घरून निघाल्या.

    गावातून येत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिकेने त्‍यांना जोरदार धडक दिली. यात संगीताबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्‍यू झाला. एकीकडे मुलगा रुग्णालयात दाखल तर दुसरीकडे सुनबाईचा मृत्यू यामुळे इंदुबाई यांना मोठा धक्का बसला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्‍यानंतर तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी संगीताबाई यांना मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.