लाईव्ह महाराष्ट्र: पाळधी दूरक्षेत्र हद्दीमधील एरंडोल तालुक्यातील सावदे प्र.चा. शिवारातुन दोन कट्टे , दोन काडतुसे व दोन मोटारसायकल जप्त करीत पाळधी पोलिसांनी ४ आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यापैकी एक आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.
नाशिक परिक्षेत्रचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर याच्या आदेशनव्ये गेल्या एक महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे करणारे तसेच अवैध रित्या अग्नीशस्त्र बाळगणारे तसेच अमलीपदार्थाची तस्करी करणारे यांचे विरुद्ध कार्यवाही करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यात कारवाई सुरू आहे.
पाळधी दुरक्षेत्र स.पो.नि. गणेश बी, बुवा यांना मिळालेल्या गुप्तबातमीचे आधारे सपोनि गणेश बुवा,सहा.फौज.नसिम तडवी, पोहेकॉ विजय चौधरी, पोहेकी संजय महाजन, पोहेको अरुण निकुंभ, पोहेको गजानन महाजन पोना २
उमेश भालेराव, पोकॉ. अमोल सुर्यवंशी,
पो.कॉ. ज्ञानेश्वर बावीस्कर,पोको.किशोर चंदनकर, पोको दत्तात्रय ठाकरे यांनी १९ रोजी सकाळी ०४.३० वा.चे सुमारास पाळधी दूरक्षेत्र हद्दीत एरोडल तालुक्यातील सावदे प्र.चा शिवारात सुनिल बापु सोनवणे (वय २५ )दिलीप हिरामण सोनवणे( वय-२६ दोन्ही रा.सावदे
प्र.चा.ता.एरंडोल) विशाल किरण मालचे( वय-१७ वर्षे रा.मेहुणबारे ता.चाळीगाव) असे मिळुन आले असुन त्याना ताब्यात घेण्यात आलेले आहे. तसेच आरोपी क काल्या उर्फ भुषण तुकाराम मोरे रा. परधाडे ता.पाचोरा हा फरार असुन मिळुन आलेले आरोपी यांच्या ताब्यातुन दोन गावटी बनावटीचे पिस्तोल व दोन जिवंत काडतुस तसेच दोन मो.सा, असा एकुण ७६ हजाराचा किमतीचा मुद्देमाल मिळुन आले.त्याच्या विरुध्द धरणगाव पो.स्टे.ला गुरनं. ०३४८/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५. सह म.पो.का.क. ३७(१),(३),चे उल्लघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील पाळधी दुरक्षेत्रचे स.पो.नि.गणेश बुवा हे करित आहेत.