९ रोजी होणार पुढील सुनावणी !
जळगाव : शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कोण असणार ? याबाबतचा निर्णय ५ जानेवारी २०२३ रोजी औरंगाबाद येथील मॅट मध्ये होणार होता. याकडे अधिकाऱ्यांसह, नगरसेवक व जळगावकर नागरिकांचेही लक्ष लागले लागले होते. पण या प्रक्रियेला परत एकदा कोर्टाने तारीख देऊन प्रकरण पुढे ढकलले आहे.
मनपाच्या आयुक्तपदावर असलेल्या डॉ.विद्या गायकवाड यांच्या जागी परभणी महानगरपालिकेतून आलेले देविदास पवार यांना आयुक्त पदाची सूत्र देण्यात आले होते. त्यांनीही जळगाव महानगरपालिकेची तात्काळ सूत्रे हाती घेतली होती. पण कार्यकाळ पूर्ण झाला नाही आणि कोणतेही सबळ कारण न देता अचानक बदली झाली कशी ? म्हणून या बदली विरोधात डॉ.विद्या गायकवाड यांनी मॅट (महाराष्ट्र ॲडमिनीस्टेटीव्ह ट्रिब्युनल) कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आत्तापर्यंत दोनदा सुनावणी झाली . तर तिसरी सुनावणी ५ जानेवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. ५ रोजी या प्रकरणावर सुनावणी होऊन ९ जानेवारी ही पुढील तारीख देण्यात आल्याची माहिती सूत्रांद्वारे प्राप्त झाली आहे. ५ रोजी जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदावर कोण राहणार ? याबाबत निर्णय होणार. याकडे मनपातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जळगावातील नगरसेवक, नागरिकांचे लक्ष लागले होते. पण या प्रकरणास पुढील तारीख कोर्टाने दिल्याने पुढे याबाबत काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.