जळगाव : प्रतिनिधी
शहरातील जळगाव धुळे महामार्गांवर खोटे नगर जवळ एका टॅक्टर ने दुचाकी स्वाराला जबर धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील खोटे नगरहून बांभोरी जाणाऱ्या महामार्गावर दुचाकीने एका महाविद्यालयात पेपर देण्यासाठी जात असलेल्या दोन मित्रांच्या दुचाकीचा व टॅक्टरचा भीषण अपघात झाला कि, ३० वर्षीय तरूण प्रश्नात भागवत कोळी (वय ३०) गवखेडा ता.रावेर हा जागीच ठार झाला आहे. याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात आणले असता त्याला सीएमओ दीपक जाधव यांनी मयत घोषित केले आहे. तर दुसरा मित्र जयेश द्वारकानाथ पाटील(वय २३) गवखेडा ता.रावेर हा जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात इतका भीषण होता कि, टॅक्टरहि पलटी झाले आहे तर दुचाकी हि रस्त्यावर फेकली जावून तरुणाचे छिन्न विछिन्न अवस्थेत तरूण होता. घटनास्थळी तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.