Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तालुक्यात अज्ञाताचा मृतदेह आढळला !
    क्राईम

    धरणगाव तालुक्यात अज्ञाताचा मृतदेह आढळला !

    editor deskBy editor deskJanuary 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील पिंपळेसिम येथे अज्ञात ४० वर्षीय प्रौढाचा मृतदेह विहिरीत आढळला असून हा मृतदेह पाण्यात फुगल्यामुळे अवस्था अत्यंत खराब झाली होती. त्यामुळे ओळख पटविणे शक्य नव्हते.

    दि. ३ जानेवारीला सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पिंपळेसिम येथील संतोष पाटील आला. यांच्या शेतातील विहिरीत एक मृतदेह तरंगताना आढळला. लागलीच पोलिस पाटील भगवान लक्ष्मण पाटील यांना कळवले. यानंतर घटनास्थळी धरणगाव पोलीस हजर झाले. मृतदेहाची अवस्था बघता हा इसम साधारण एक-दीड दिवसाआधी विहिरीत पडला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यानंतर रात्री मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर दि. ४ रोजी पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला. दरम्यान, धरणाव पोलिसांनी याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच आजूबाजूच्या गावात स्वतः फिरून विचारपूस करण्यात आली. अगदी दवंडीदेखील देण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.