धरणगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव शहरातील गिरणा काठी जात वाळू माफियांचे धाबे दणाणले होते तर आज धरणगाव शहरात एका ठिकाणी छापेमारी करत रेशन दुकानदारकांचे धाबे दणाणले आहे.
मिळालेली माहिती अशी की शहरातील दोन गोडाऊन वर आज दिनांक ४ रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या पथकाने एका गोडाऊन वर छापा मारीत त्या ठिकाणी मोठ्या जागेत धान्य आढळून आले तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धान्यसाठा आढळून आला. जिल्हाधिकारी मित्तल यांच्या पथकाने हे गोडाऊन सील करतात त्यांनी लागलीच दुसऱ्या गोडाऊन वर धडक देत त्या ठिकाणी मोठ्या परिसरात धान्यसाठा आढळून आला त्यामुळे ते गोडाऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी सील केले.
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्यांच्या गोडाऊन वर सील केले आहे त्यांना पावती दाखवायच्या सूचना केली करण्यात आले असून त्यांच्याकडून खुलासाही आल्यानंतर कारवाईची दिशा ठरेल असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले आहे.