धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून मानले जाणारे भैय्या मराठे सर यांची नुकतीच बाळासाहेबांचे शिवसेनेच्या युवा सेना जिल्हा उपसंघटकपदी निवड करण्यात आली आहे.
बोरगाव येथील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक भैय्या मराठे सर याची बाळासाहेबांचे शिवसेनेच्या युवा सेना जिल्हा उपसंघटकपदी निवड करण्यात आलेली असून त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, जि प सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले.