जळगाव : प्रतिनिधी
एका तालुक्यातील महिला डॉक्टरसोबत वारवार मोबाईल क्रमांकावरुन अश्लिल संभाषण करणा-या मोबाईलधारकांविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल शहरातील येथील एका महिला डॉक्टरला २९ डिसेंबरपासून जवळपास १४ ते १५ अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन नेहमी फोन केले आहेत. या महिला डॉक्टरचा मोबाईल क्रमांक या मोबईलधारकांनी मिळवून अश्लिल संभाषण करुन मानसिक त्रास देण्याचा प्रकार सुरु आल्याने अखेर या महिला डॉक्टरने सायबर पोलिस स्टेशन गाठत सायबर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे पुढील तपास करत आहेत.