धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील इलेक्ट्रिकचे दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार असे की, तालुक्यातील भवरखेडा गावातील बस स्टॅन्ड परिसरात असलेले दीपिका इलेक्ट्रिकल या ठिकाणी दिनांक १४ डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री अनोळखी चोरट्यांनी ३ हजार रुपये किमतीची एचपी इलेक्ट्रिक मोटर, ५ हजार रुपये किमतीची एक टेक्समो कंपनीची एचपी इलेक्ट्रिक मोटर, १० हजार रुपये किमतीची एक अजंता कंपनीचे पाच एचपी इलेक्ट्रिक मोटर, त्यासोबत १२ हजार रुपयाची लुबी कंपनीची एचपी इलेक्ट्रिक मोटर असा ३० हजार रुपयांचे एवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी स्वप्निल अधिकार पाटील यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.खुशाल पाटील हे करीत आहे.