पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांने दिले निवेदन
धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील विविध विकास कामांसह वडा नदी पात्रासह धरणगावपर्यंत नवीन पाईप लाईनसाठी निधी मिळावा, या मागणीसाठी आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांना पत्र देत निधीची मागणी करण्यात आली. यामुळे धरणगावची पाणी समस्या कायमची सुटून धरणगावच्या विकासामध्ये मोठी भर पडणार आहे.
मिळालेली माहिती अशी की, धरणगाव शहरातील विविध विकास कामांसाठी तसेच गुळ नदी प्रकल्प ते धावडा नदी पात्रात पाण्याचे आवर्तन घेत असतांना मोकळ्या पत्रातून घेतले जात होते. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. त्यामुळे याठिकाणी बंदिस्त पाणी टाकल्यास पाण्याची बचत होईल. तर दुसरीकडे धावडा ते धरणगावपर्यंतची पाईप लाईन जुनी झाली असल्यामुळे सतत गळती होत असते. त्यामुळे देखील पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असते. यामुळेच या दोघं कामांसाठी 55 कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन स्वीकारत लवकरच निधी देण्याची मान्य केले आहे. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, पालिका गटनेते विनय (पप्पू) भावे, मोतीआप्पा पाटील, विलास महाजन, वाल्मीक पाटील, शिवराज पाटील, प्रशांत देशमुख यांच्यासह आदी उपस्थित होते. दरम्यान, धरणगावची पाणी समस्या कायमची सुटणार पेच धरणगावच्या विकासामध्ये मोठी भर पडणार आहे. प्रशांत देशमुख यांच्यासह आदी उपस्थित होते.