मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाने आज सकाळी प्रकाश आंबेडकर यांच्याशी युतीची चर्चा करीत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत युतीची चर्चा करून प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी युती जाहीर हि करून टाकली आहे.
राज्याला धाडसी मुख्यमंत्री लाभला आहे, असे म्हणत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी बाळासाहेबांच्या सुतीसोबत युती केल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री शिंदेवर आमचा विश्वास आहे, असे वक्तव्य जोगेंद्र कवाडे यांनी केले आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांची संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. या निमित्ताने शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे. पत्रकार परिषदेचे आयोजन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे हे अधिकृतरित्या युतीची घोषणा केली आहे.
सर्वांना न्याय मिळवून देणार असे म्हणताना आम्ही राज्यभरात 5 सभा घेणार आहोत असे कवाडे सांनी म्हटले आहे. मविआ सरकारने आमच्या निवेदनाची नोंदही घेतली नाही. मात्र, एकनाथ शिंदेंनी लगेच आमच्या निवेदनाची दखल घेतली असे म्हणत एकनाथ शिंदे हे जे बोलतात ते करतात असे म्हटलं आहे. आमच्यावर अनेकवेळा ह्ल्ले झाले, मात्र आम्ही काम थांबवले नाही, आणि आमच्या प्रयत्नांना यश मिळाले असे कवाडे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सर्वांना मुख्यमंत्री आपला माणूस आहे असे वाटतंय म्हणून एकत्र येत काम करताय. जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत युती झाल्याचा मला आनंद आहे. त्यांचा आणि आमचा दोन्ही पक्ष हे संघर्षातून पूढे आले आहेत, हा साधासोपा संघर्ष नव्हता. दोन्ही पक्ष लोकांना न्याय देण्यासाठी एकत्र आले आहेत, मात्र या आधीपासून माझे आणि कवाडे यांचे संबंध चांगले होते असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे, आता एक चांगली सुरूवात झाली असल्याचे शिंदेंनी म्हटले आहे.
कवाडे यांनी केलेले ओबीसी आंदोलन हे देशव्यापी होते. त्यांनी लॉग मार्च काढले संघर्ष केला आणि ते आज इथेपर्यंत आले आहेत. यापुढे महाराष्ट्रसाठी आम्ही सोबत येऊन चांगले काम करू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आंबेडकरी चळवळीमधील नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे आणि कवाडे युतीच्या चर्चा सुरू झाल्या, दोन दिवसांपूर्वी झालेल्या तासभराच्या चर्चेनंतर आता दोघांची एकत्र पत्रकार परिषद असल्याने हा महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे. गेली अनेक दिवस उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये युती होणार असे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जोगेंद्र कवाडे यांनी घेतलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट ही राज्यातील नव्या समीकरणाची नांदी म्हणता येऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दलित पँथरनंतर आता जोगेंद्र कवाडे यांच्यात झालेल्या तासभराच्या चर्चेमुळे एकनाथ शिंदे यांचा ठाकरे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगतेय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यात जवळपास 1 तास चर्चा झाली. यानंतर कवाडे यांनी शिंदेंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. यामुळे एकेकाळी मविआत असलेले कवाडे आता शिंदे-फडणवीस यांच्यासोबत दिसणार की काय असा सवाल राजकीय वर्तुळात अनेकांना पडला आहे. गेली अनेक दिवस जोगेंद्र कवाडे हे मविआवर नाराज होते. मविआ सरकार मित्रपक्षांना विसरले असा आरोपही त्यांनी केला होता. एकेकाळी शिवसेनेवर टीका करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनीही ठाकरे यांची जवळीक साधलीय. काही दिवसांपूर्वी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी वंचित बहूजन आघाडीकडून युतीसाठी सकारात्मक चर्चा सुरू आहे. दोन बैठका झाल्या असे सांगण्यात आले.यामुळे आता राज्यात शिवश्क्ती- भीमशक्तीचा नारा पहिले कोण देणार याकडे सर्वाचे लक्ष्य लागले आहे. भविष्यात शिंदे आणि कवाडे एकत्र आल्यास आणि आंबेडकर आणि ठाकरे गट युती झाल्यास त्याचा ठाकरे गट आणि शिंदे गटाला किती फायदा होणार? त्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलणार का हे आता पाहावे लागेल.