• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यातील वीज कंपनीचे कर्मचारी संपावर !

editor desk by editor desk
January 4, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
राज्यातील वीज कंपनीचे कर्मचारी संपावर !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील नागरिकांमध्ये मोठ संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच महावितरण कर्मचारीनी मध्यरात्रीपासून बेमुदत आंदोलन सुरु केल्याने अजून नागरिक गैरसमज आहे कि लाईट जाणार असल्याची भीती नागरिकांना लागून राहिली आहे. पण वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीने पुकारलेल्या आंदोलनानंतर प्रधान ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकासोबत समितीची बैठक सोमवारी (ता. दोन) झाली. बैठकीमध्ये ठोस असे आश्वासन न मिळाल्यामुळे वीज उद्योगातील कर्मचारी संघटनांच्या संघर्ष समितीने तीन जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.

गेल्या दीड महिन्यापासून वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीने खासगीकरणाविरोधात आंदोलन केले. लोकप्रतिनिधींना भेटून वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे शासनाचे असलेले धोरण निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. जनतेचे व सरकारचे लक्ष वेधण्याकरीता नागपूर विधानसभेवर ३५ हजार वीज कामगारांनी विराट मोर्चा काढला. यानंतरही मुख्यमंत्री यांच्याच भागात अदानी यांनी समांतर वीज वितरणाचा परवाना मागितल्यामुळे त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यानंतर शासन व व्यवस्थापनाकडून संघर्ष समितीला चर्चेला बोलावून खासगीकरणाचे धोरण आम्ही मागे घेतो, असे स्पष्ट आश्वासन देणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेले नाही.
ऊर्जा सचिवांच्या बैठकीत ठोस असे कुठलेही आश्वासन संघर्ष समितीला मिळाले नाही. त्यामुळे मंगळवारी (ता. तीन) मध्यरात्रीपासून ७२ तासांच्या संपावर जाण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतला आहे. या संपामध्ये तीन वीज कंपन्यांतील ८६ हजार कर्मचारी, अभियंते, अधिकारी व चाळीस हजारांच्या वर असलेले कंत्राटी कामगार सहभागी होणार आहेत.

ग्राहकांसाठी नियंत्रण कक्ष
समांतर वीज वितरण परवान्याविरोधात होणाऱ्या महावितरणचे कर्मचारी, अभियंता, अधिकारी यांच्या राज्यव्यापी संपात अमरावती परिमंडळातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे संपकाळात सुरळीत वीज पुरवठ्याची सर्व खबरदारी घेतली असली तरी, या काळात ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अमरावती परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

संघर्ष समितीकडून नागरिकांना आवाहन
वीज कर्मचारी ७२ तासांच्या संपावर जाणे जवळपास निश्‍चित झाले आहे. पहिल्यांदा सर्व संघटना खासगीकरणाविरोधात एकवटल्या आहेत.
त्यामुळे एकही कर्मचारी कामावर नसणार आहे. या काळात नागरिकांना सुविधांचा त्रास होवू नये, म्हणून पाणी, दळण तसेच मोबाईल चार्जिंग करून ठेवावे. असे आवाहन संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे.

संपकर्त्या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
महावितरणला नफा असलेल्या भागात अदानीसारख्या खासगी भांडवलदारांना समांतर वीज वितरणाचा परवाना देण्यात येऊ नये. महानिर्मिती कंपनीच्या मालकीचे जलविद्युत केंद्र खासगी भांडवलदारांना विक्रीकरीता खुले करू नये. तिन्ही वीज कंपन्यातील असलेल्या ४२ हजारांच्या वर रिक्त पदे भरावी.

Previous Post

शिंदे गटाचे पदाधिकारी लागले कामाला ; जम्बो कार्यकारिणी केली जाहीर !

Next Post

नव्या वर्षात सोन्याचे दरवाढ !

Next Post
नव्या वर्षात सोन्याचे दरवाढ !

नव्या वर्षात सोन्याचे दरवाढ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group