धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील वाली गल्लीतील रहिवासी संजय विठ्ठल वाणी यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी क्रमांक एम.एच.19.डी.डी ०४५४ सुमारे ४५ हजार रुपये किमतीची युनिकॉन ही दुचाकी दिनांक २७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संजय वाणी यांनी धरणगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ.रामदास पावरा हे करीत आहे.