जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात तब्बल चार लाखांची घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील अयोध्या नगर परिसरातील अशोक नगर मधील उषा रेसीडन्सी मधील फ्लॅट क्रमांक ५ मधील रहिवासी सनी विकास सोनार यांच्या मालकीच्या फ्लॅटमधून दिनांक २ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करून घरातील बेडरूम मधील कपाटातील ३ लाख ९७ हजार ९१५ रुपयाचे सोन्याचे दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दिनांक ३ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी पुढील तपास करीत आहे.