अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील निम येथील माहेर असलेल्या विवाहितेचा माहेरून पाच लाख रुपये आणले नाहीत म्हणून छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध मारवड पोलीसात फिर्याद देण्यात आली आहे.
फिर्यादी तेजस्विनी धर्मराज बाविस्कर यांचे लग्न मनुदेवी आडगाव ता. यावल येथील धर्मराज रामदास बाविस्कर यांच्यासोबत झाले. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी दागिने काढून घेत सोन्याची ब्रासलेट व पाच लाख रुपये हुंडा द्यायला हवा होता म्हणून छळ सुरु केला.
एप्रिल महिन्यात मुलीसह विवाहितेला माहेरी हाकलून लावले. त्यानतंर 18 डिसेंबर रोजी विवाहितेने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केल्याचे समजल्याने सासरची मंडळीनी निम येथे येवून तक्रार का केली अशी विचारणा करत विवाहितेच्या वडिलांना मारहाण व शिवीगाळ करून पाच लाख रुपये दिले तरच नांदण्यास घेवून जावू असे सांगून निघून गेले. त्यामुळे विवाहितेने मारवड पोलीसात धर्मराज रामदास बाविस्कर, विजया रामदास बाविस्कर रामदास आनंदा बाविस्कर, लक्ष्मी रामदास बाविस्कर सर्व राहणार आडगाव ता. यावल, ललिता प्रमोद ठाकरे रा. सुरत, योगिता सुनील पवार रा. मुंबई यांच्या विरुद्ध तक्रार केली. पुढील तपास पो.ना. सुनील तेली करीत आहेत.