अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातून तरुणाची दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील शहा आलम नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या 30 वर्षीय इमरान खान हबीब खान पठाण या तरुणाची दुचाकी घराच्या बाहेर लावलेली असताना दिनांक १ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी दुचाकी एम.एच.१९.६१५८ ही ३० हजार रुपये किमतीची चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात दिनांक दोन रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास पोहेको प्रमोद पाटील हे करीत आहे.