जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २२ वर्षे विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील दूध फेडरेशन परिसरातील महावीर नगरातील २२ वर्षीय विवाहिता सुकेशनी रोहिणी मेंढे हिच्या माहेरच्यांनी आपल्या पतीला व सासूला हुंडा न दिल्याच्य कारणावरून तिला शिवीगाळ व मारहाण करीत मानसिक त्रास देऊन तिने घराच्या बाथरूम मधील लायझर नावाचे टॉयलेट क्लीनर पिल्याने ती गंभीर होवून विवाहिता उपचारार्थ शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार सासू आशाबाई मिलिंद मेंढे व पती रोहित मिलिंद मेंढे दोन्ही राहणार महावीर नगर जळगाव यांच्या विरोधात स्त्री अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नको ना स्वप्नाली सोनवणे हे करीत आहे.