नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सहा वेगवेगळ्या कंपन्यांचे 65 हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तागत करण्यात आले आहेत.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गर्दीचा फायदा घेत चोरीच्या उद्देशाने दोन चोरटे दाणा बाजार परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती डीबी पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचत शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दाणा बाजार परिसरातून आरोपी सर्वजीत कुमार अर्जुन महतो (वय 24 रा. नया टोल कल्यानी महाराजापूर बाजार ता. तालझरी जि. साहेबगंज झारखंड) व सनी कुमार महेंदार नोणी या (वय 23 रा. नया टोल कल्यानी महाराजापूर बाजार ता. तालझरी जि. साहेबगंज झारखंड )या दोघांना ताब्यात घेतले.
दरम्यान त्यांची झाडाझडती केली असता त्यांच्याजवळ सुमारे 65 हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे सहा मोबाईल आढळून आले. त्यातील एक मोबाईल जळगाव शहर पोलीस स्टेशन 387/2022 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ विजय निकुंभ, पोहेकॉ भास्कर ठाकरे, पोहेकॉ उमेश भांडारकर, पोना योगेश पाटील, पोना गजानन बडगुजर, पोकों तेजस मराठे, रतन गिते, पोकों अमोल ठाकुर, योगेश इंधाटे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस नाईक गजानन बडगुजर करत आहेत.