चाळीसगाव – कल्याणचे माजी आमदार व भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पाच दिवसीय उत्तर महाराष्ट्र विभागीय दौऱ्याचा निमित्ताने दि.७ ऑगस्ट रोजी चाळीसगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश सह संयोजक अशोकराव चोरमले, महिला आघाडी प्रदेश संयोजक डॉ उज्वलाताई हाके, प्रदेश युवती संयोजक भाग्यश्री ढाकणे, उत्तर महाराष्ट्र संयोजक नवनाथ ढगे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी, प्रदेश कार्यालय मंत्री राज खैरनार, विजाभज आघाडी जिल्हाध्यक्ष शालीग्राम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तर भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पंचायत समिती गटनेते संजय भास्कर राव पाटील, न पा गटनेते संजय रतनसिंग पाटील, जेष्ठ नेते राजेंद्रअण्णा चौधरी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, विजाभज आघाडी तालुकाध्यक्ष दिनकर राठोड, महिला आघाडी शहराध्यक्ष सौ.संगीताताई गवळी, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, नगरसेवक नितीन पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष आंनद जी खरात, सरचिटणीस धनंजय मांडोळे, गिरीष बरहाटे, अमोल चव्हाण, रोहिणीचे माजी सरपंच अनिल नागरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशानुसार राज्यातील भटक्या विमुक्त समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, त्यांच्या तांडा, वस्तीवर जाऊन संवाद साधण्यासाठी हा उत्तर महाराष्ट्र विभागीय दौरा आयोजित केला असून चाळीसगाव तालुक्यात सर्वसामान्य कष्टकरी, वंचित जनतेशी नाळ असणारे आमदार मंगेश चव्हाण व मजबूत भाजपा संघटनेच्या माध्यमातून निश्चितच भटक्या विमुक्तांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न होतील असा विश्वास माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला.
चाळीसगाव दौऱ्याची सुरुवात शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी धनगर समाजाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. धनगर समाजाच्या मागणी नुसार आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या निधीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक सुशोभीकरणसाठी ७ लाख व स्मशानभूमीसाठी ७ लाख रुपये देण्याचे जाहीर केले.
यावेळी धनगर समाजाचे मार्केट संचालक धर्मा बापू काळे, तालुकाध्यक्ष सायबु नाना आगोणे, धनगर समाज सेवा संस्था तालुकाध्यक्ष बापू लेणेकर, आबासाहेब रावते, धर्मा बछे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष शांताराम आगोणे, युवा मोर्चाचे प्रदीप देवरे, ज्ञानेश्वर साबळे, सायगावचे पोलीस पाटील आबासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात भटक्या विमुक्त समाजाचा मेळावा व पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की भारतीय समाज हा जातीपोटजातीमध्ये विभागलेला समाज आहे. भारतीय समाज व्यवस्थेत भटक्या विमुक्त हा महत्वाचा घटक असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुलाब बाबू राठोड बोढरे सरपंच यांची विजाभज आघाडी तालुका सरचिटणीस, जुनोने सरपंच
गोरखनाथ बालचंद राठोड यांची तालुका उपाध्यक्ष, कोदगाव सरपंच दशरथ चव्हाण तालुका संयोजक, ज्ञानेश्वर चव्हाण सेवानगर तालुका सहचिटणीस आदी पदांवर नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अशोक राठोड यांनी मानले.
करगाव येथे शाखेचे उद्घाटन
माजी आमदार नरेंद्रजी पवार व नवनाथजी ढगे व आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करगाव येथे भाजपा विजाभज आघाडीचे शाखा उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी वि. जा. भ. ज. आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शालीग्राम पवार, करगाव येथील सरपंच किरण देवरे, इच्छापूर गावचे सरपंच निलेश राठोड, तांबोळे गावचे सरपंच निलेश जाधव, भाजपा सरचिटणीस धनंजय मांडोळे, प्रशांत मराठे, राम पाटील, कैलास पाटील, ग्रामसेवक पंकज चव्हाण तसेच नवीन शाखेचे अध्यक्ष भूषण राजेंद्र पवार व कार्यकारणीचे उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सदस्य उपस्थित होते