औरंगाबाद : वृत्तसंस्था
हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे व फडणवीस सरकार मधील मंत्र्यांवर आरोप – प्रत्यारोप केल्यानंतर आता शिंदे सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ होणार आहे. सत्तार सातत्याने वादग्रस्त विधान करत आहेत. त्यातच शिक्षकभरती घोटाळा आणि कृषीप्रदर्शनाचा वाद समोर आला आहे. आता सत्तार यांची थेट सीबीआयकडे तक्रार करण्यात आली आहे.
औरंगाबादमधील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांच्यासह पाच जणांनी सीबीआयकडे सत्तार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी सीबीआयकडे केली आहे. तसेच सत्तार यांनी जमीन बळकावल्याचा आऱोपही करण्यात आला आहे.
महेश शंकरपल्ली यांनी म्हटलं की, माझ्या तालुक्यातील ज्या लोकांच्या जमिनी सत्तार यांनी बळकावल्या, त्या लोकानी माझ्यासोबत येऊन सीबाआयकडे तक्रार केली आहे. सत्तार यांच्याकडे या मालमत्ता कशा आल्या, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सत्तार यांच्या अढचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान सत्तार यांनी सिल्लोडमध्ये कृषीप्रदर्शनाच आयोजन केले आहे. यावरून सत्तार यांच्यावर आरोपांची राळ उठली होती. हे कृषीप्रदर्शन आजपासून सुरू झालं आहे. सत्तार यांनी कृषी अधिकाऱ्यांना एक कोटी २० लाख रुपये जमविण्याचा नियमबाह्या आदेश दिले होते, असे आरोपही सत्तार यांच्यावर झाले होते. याच कृषीप्रर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.