जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मुख्य चौकातून एका वृद्ध व्यक्तीचा मोबाईल लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील आनंदनगर मोहाडी रोड परिसरातील रहिवासी कन्हैयालाल मेघराज कृपलानी (वय ७३) हे दिनांक 31 डिसेंबरच्या दुपारच्या सुमारास शहरातील साने गुरुजी चौकातील प्रकाश मेडिकल जवळ या ठिकाणी काही कामानिमित्त आले असता अनोळखी इसमाने त्यांच्या पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केल्याचे घटना घडली आहे याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. गजानन बडगुजर हे करीत आहे.