भुसावळ : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी साठ वर्षीय आरोपीविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, फेब्रुवारी २०१२ रोजी एका अल्पवयीन मुलीशी लग्न केले होते. यानंतर ती गर्भवती राहिली होती. याबाबत जळगावच्या बालकल्याण समितीकडे तक्रार करण्यात आली होती. अमजद इब्राहिम कुरेशी (६०, रा. आगाखान वाडा) असे या आरोपीचे नाव आहे. या मुलीस बालकल्याण समितीने ताब्यात घेऊन जबाब घेतला. त्यानुसार बाजारपेठ पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी कागदपत्र वर्ग करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास एपीआय हरीश भोये, योगेश महाजन हे करीत आहेत.