Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांनी जनतेला नवीन वर्षाचा दिला सल्ला !
    राजकारण

    उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांनी जनतेला नवीन वर्षाचा दिला सल्ला !

    editor deskBy editor deskDecember 31, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बीड : वृत्तसंस्था 

    उद्यापासून नवीन वर्षाला आपण सर्वच लोक काहीना काही संकल्प करीत असतो असेच संकल्प राजकीय जीवनात अनेक नेते मंडळी करीत असतात. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हि मागे नाहीत.

    बीड येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, एका व्यक्तीनं व्यसनमुक्तीची मोठी रॅली नि मोठा कार्यक्रम करायचा आहे, असं मला सांगितलं.अलीकडच्या काळात नवीन वर्ष साजरं करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दारु आणि इतर व्यसनांची पार्टी केली जाते. युवा पिढीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. दारु पिऊन लोकं भांडण करतात. अपघात होतात. चरस, गांजा ओढण्याचा प्रयत्न केला जातो. अशा सगळ्या लोकांना व्यसनापासून दूर करायचं आहे, असा त्या व्यक्तीचा संकल्प होता. ते व्यक्ती म्हणाले, त्यामुळं मी ठरवलंय. नाही, तर मसाला दूध लोकांनी पिलं पाहिजे. नवीन वर्षाचं स्वागत केलं पाहिजे. हा कार्यक्रम मी घेतोय. हा खूप चांगला संकल्प आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातही हा उपक्रम पोहचेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
    देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी त्यांना गमतीनं म्हणालो, मी तर व्यसनमुक्तचं आहे. व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात येऊन मी काय करू. मी तर व्यसनमुक्तचं आहे. मला कुठंलंच व्यसन नाही. व्यसन नाही केलं तर माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणून मी तुम्हाला याठिकाणी बोलवतोय, असं त्या व्यक्तीनं म्हंटलं, असं फडणवीस यांनी सांगितलं.नवीन वर्षाची धामधूम सुरू आहे. २०२२ चं सरत वर्ष कसं घालवायचं याचे आराखडे तयार आहेत. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा सल्ला दिला. दारुऐवजी दूध प्या नि निरोगी राहा, असं त्यांना या क्रार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं होतं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.