धरणगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका रस्त्यावर चक्क रस्त्याचे दोन भाग झाल्याचे असल्याने ‘धरणगाव तालुक्यात चक्क एका रस्त्याचे झाले दोन रस्ते ; ठेकेदाराचा हलगर्जी पणा ?’ या मथळ्या खाली लाईव्ह महाराष्ट्रने प्रसिद्ध केली होती याच बातमीची दाखल घेत आज मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट रस्त्यावर उतरत पाहणी करीत आदेश केले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील चमगाव फाटा ते उखळवाडी शेत रस्त्याचे काम गेल्या चार ते पाच महिन्या आधी करण्यात आलेले आहे. या रस्त्याने जाणारे प्रत्येक नागरिक या रस्त्याचे आश्चर्य व्यक्त करीत आहेत. कारण या मुख्य रस्त्याच्या मधोमध एक मोठी भेग पडली आहे, त्यामुळे परिसरातील शेतकरी नेहमी बैलगाडी घेऊन जात असतात, त्यामुळे बैलांचा पाय या भेगात अळकून अपघात होण्याची शक्यता आहे. तर दुसरी बाब म्हणजे रस्त्याच्या बाजूला या ठेकेदाराने मुरूम देखील टाकलेला नसल्याने आरोप शेतकरी वर्गाने केला आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे शेतकरी म्हणत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी खूप त्रस्त झाले असून याकडे लवकरात लवकर सबधीत विभागाने लक्ष द्यावे अशी देखील मागणी शेतकऱ्यानी लाईव्ह महाराष्ट्रच्या प्रतिनिधीकडे केली होती, त्याच बातमीची दाखल मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेत थेट रस्त्यावर आज दि ३१ डिसेंबर रोजी पाहणी करीत संबधित विभागाला व ठेकेदाराची कान उघडणी करीत पुन्हा त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात मंत्र्यांनी समोरच केली आहे. तर ना.पाटील यावेळी बोलतांना म्हणाले कि, जर जळगाव ग्रामीण मतदार संघात कुठेही असे काम होत असल्यास हि बाब माझ्यापर्यत पोहचवा संबधित ठेकेदारावर मी कारवाई करेल असेही यावेळी लाईव्ह महाराष्ट्रच्याशी बोलतांना ना.पाटील म्हणाले.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या वृताची दखल घेवून मी आज रस्त्याची पाहणी केली आहे. रस्त्याच्या साईड पट्टीचे काम माझ्यासमोर सुरु झाले आहे व उर्वरित काम येत्या दोन दिवसात पूर्ण करण्यात येईल. जळगाव ग्रामीण मतदार संघात जर असे निकृस्ट काम होत असतील तर संबधित माक्तेदारावर कठोर कारवाई करेल.
– ना.गुलाबराव पाटील (पालकमंत्री जळगाव जिल्हा)