• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शाळकरी मुलींची ट्रॅव्हल कोसळली; २४ जखमी ; बारामतीत उपचार सुरु

editor desk by editor desk
December 31, 2022
in क्राईम, राज्य
0
शाळकरी मुलींची ट्रॅव्हल कोसळली; २४ जखमी ; बारामतीत उपचार सुरु

पुणे : वृत्तसंस्था 

वर्षाच्या अखेरीस राज्यात भीषण अपघाताची बातमी आली आहे. शाळकरी मुलींच्या सहलीची बस (ट्रॅव्हस) आज पाहटे चार वाजल्याच्या सुमारास कोसळली.या अपघातात ३ मुली गंभीर, तर २४ मुली किरकोळ जखमी झाल्या. हि घटना बारामती-पाहुणेवाडी हद्दीतील एका पुलावर घडली आहे.

बारामती महिला हाॅस्पीटलमध्ये जखमी मुलींवर पुढील वैद्यकिय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकिय सूत्रांनी सांगितले.अपघातग्रस्त यशदा ट्रॅव्हलमध्ये एकूण ४८ मुली, पाच शिक्षक प्रवास करीत होते. तसेच दोन चालकांपैकी श्रीपाद पाटील हा अपघातग्रस्त ट्रॅव्हल चालवित होता. पहाटेच्यावेळी चालकाच्या डोळ्यावर झोप लागल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला असावा, अथवा रस्त्यावरील पुल व वळणाचा आंदाज न आल्याने वरील अपघात घडला असावा,असा आंदाज प्रथमदर्शनी पोलिसांनी वर्तविला आहे.
विशेषतः घटनेचे गांर्भिय विचारात घेत माळेगाव, वडगाव निंबाळकर आणि बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक रहिवाशीच्या मदतीने पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेबरोबरच पोलिस गाडीतून संबंधित अपघातग्रस्त मुलींना बारामती महिला रुग्णालयात पुढील उपचारासाठी भरती केले. या बाबत अधिक माहिती सांगता पोलिस निरिक्षक किरण अवचर म्हणाले,“इचलकरंजी-कोल्हापूर येथील खासगी सागर कल्सासेसची ८ वी ते १० इयत्तेमधील मुलींची सहल यशदा ट्रॅव्हलमधून शिर्डी येथे गेली होती. सदरची सहल संपवून आज पहाटे साडेतीन ते चार वाजल्याच्या सुमारास ही ट्रॅव्हल्स बारामतीकडून फलटण मार्गे निघाली होती.वरील ट्रॅव्हलच्या चालकाचा पाहुणेवाडी येथील पुलावर गाडीचा ताबा सुटला. गाडी ओढ्यात कोसळली. त्यामध्ये तीन मुली गंभीर जखमी झाल्या असून २४ मुलींना किरकोळ शारिरीक इजा झाली आहे. सध्यातरी कोणतीही जिवीत हाणी झाली नाही.“

पाहुणेवाडी येथील पुलाची दुरावस्था पाहत नाही. रस्त्यामध्ये पडलेले खड्डे जीवघेणे झाले आहे.दिशादर्शक फलक नाहीत. परिणामी सातत्याने लाहनमोठे अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली, तर रस्त्याचे लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगितले जाते, परंतू अद्याप पर्यंत रस्त्याचे अथवा पुलाचे काम धोकादायकस्थितीत आहे. वास्तविकता रस्त्यांच्या समस्यांमुळेच शाळकरी मुलींचा अपघात झाला आहे, असे म्हणणे सरपंच जयराम तावरे, पोलिस पाटील सुरेश काटे यांनी दिली.

Previous Post

धरणगावातून दुचाकी लंपास : गुन्हा दाखल !

Next Post

धान्य गोदामात लाखोंचा अपहार ; तत्कालीन प्रांताधिकारीसह ४ तहसीलदारांवर गुन्हा दाखल !

Next Post
धान्य गोदामात लाखोंचा अपहार ; तत्कालीन प्रांताधिकारीसह ४ तहसीलदारांवर गुन्हा दाखल !

धान्य गोदामात लाखोंचा अपहार ; तत्कालीन प्रांताधिकारीसह ४ तहसीलदारांवर गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group