धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातून एकाची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सविस्तर वृत्त असे की शहरातील एरंडोल रोड वर असलेल्या रामकृष्ण नगर मधील रहिवासी रोशन शिवाजी मोरे यांच्या मालकीची दुचाकी एम.एच 19 एसी 2402 या क्रमांकाचे दिनांक 16 रोजीच्या मध्यरात्री अनोळखी चोरट्यांनी चोरून दिल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी धरणगाव पोलिसात नामदेव पितांबर महाजन (वय६०) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेगाव नाना ठाकरे हे करीत आहे