मुंबई : वृत्तसंस्था
यंदाच्या दहावी-बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधी दरम्यान तर बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान होणार आहे. सीबीएसईच्या संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक आले आहे.राज्यातील दहावी-बारावी विद्यार्थीसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
गेल्या वर्षी ज्याप्रमामे 2 टर्ममध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या तशा यंदा होणार नाही. यावर्षी एकाच टर्ममध्ये परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी याबाबत निर्णय घेण्यात आला होता. गेल्यावर्षी 35 लाख विद्यार्थी 10-12 वीत बसले होते. बारावीमध्ये एकूण 92.71 टक्के तर दहावी मध्ये 94.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
दहावी आणि बारावीसाठी प्रॅक्टिकल परीक्षा 2 जानेवारी ते 14 जानेवारी 2023 दरम्यान घेण्यात येणार आहेत. प्रॅक्टिकल परीक्षेला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास निकालात विद्यार्थी गैरहजर असल्याची नोंद करण्यात येणार आहे. यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. 10वी आणि 12वी तारखा अशा प्रकारे निश्चित केल्या आहेत की विद्यार्थ्यांच्या दोन विषयांच्या परीक्षा एका दिवशी येणार नाहीत. 12वीची वेळापत्रक तयार करताना, जेई, नीट यासह इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तारखांशी टक्कर होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.