नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऋषभ पंत कारने उत्तराखंडला जात होता. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने रुडकी येथील नारसन सीमेवर हम्मदपूर झालजवळील वळणावर ऋषभ पंतची भरधाव कार रेलिंगला धडकली. त्यानंतर कारला आग लागली आणि कार उलटली. त्यानंतर काही वेळाने आग आटोक्यात आणण्यात आली. ऋषभ पंतला उपचारासाठी तातडीने दिल्लीला पाठवण्यात आले आहे.
ऋषभ पंत दिल्लीहून घरी जात असताना हा भीषण अपघात झाला. ऋषभची कार रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथील एका वळणावर रेलिंगला धडकली. कार नारसन गावात आली असता कारचालकाचं गाडीवरील ताबा सुटला आणि रेलिंग तसेच खांबांना धडक देत कार पलटी झाली. ही धडक अत्यंत जोरदार होती. त्यामुळे कारला भीषण आग लागली. त्यामुळे बघता बघता कार जळून खाक झाली. या कारचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला. त्यामुळे हा अपघात किती भीषण होता हे दिसून येतं. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात आली.