धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात घरातून महिलेचे सोन्याची चोरी केली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने धरणगाव तालुका हादरून गेला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील रेल या गावातील रहिवासी असलेल्या निलेश पाटील(वय ३४) यांच्या आजीच्या घरावरील पत्री शेडमध्ये एकटी झोपलेली असतांना अनोळखी चोरट्याने महिलांचे डोक्यावर व तोंडावर दुखापत करीत व कान कापून कानातील ८ ते १० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना दि.२९ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी निलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अनोळखी चोरट्याविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी गणेश बुवा हे करीत आहेत.