• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या नागपूर आंदोलनात आ.मंगेश चव्हाण यांची यशस्वी मध्यस्थी…

ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या लेखी आश्वासनानंतर संघटनेने घेतला मोर्चा मागे..!

editor desk by editor desk
December 29, 2022
in राजकारण, राज्य
0
ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या नागपूर आंदोलनात आ.मंगेश चव्हाण यांची यशस्वी मध्यस्थी…

नागपूर : वृत्तसंस्था 

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मोर्चा घेऊन गेलेल्या राज्यातील हजारो संगणक परिचालक यांच्या मदतीला आमदार मंगेश चव्हाण धावून आल्याचे बघायला मिळाले. नागपूर येथे दिवसभर सुरू असलेल्या या आंदोलनात शासनाकडून कुठेलही ठोस आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत आम्ही मोर्चा मागे घेणार नाही अशी भूमिका राज्यभरातून आलेल्या संगणक परीचालकांनी घेतली होती. रात्र होऊनही त्यांनी आंदोलन स्थगित न केल्याचे तसेच सदर आंदोलनात राज्यभरातून महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांना कळताच त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांच्या मागण्या समजून घेतल्या.

आमदार मंगेश चव्हाण यांनी ही बाब ग्रामविकास मंत्री नामदार गिरिषभाऊ महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी सांगितले की शासन देखील याबाबत सकारात्मक आहे लवकरच याबाबत मंत्रालयात बैठक घेण्यासाठी पत्र देखील मंत्री महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना तात्काळ दिले व शासनाच्या वतीने सदर आंदोलकांशी चर्चा करण्याच्या सूचना आमदार चव्हाण यांना दिल्या.

तद्नंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी ग्रामविकास मंत्री नामदार गिरीषभाऊ महाजन यांचे बैठकीचे लेखी आश्वासन असलेले पत्र आंदोलनस्थळी घेऊन जात मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला.
लवकरच मंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांचे अधिकारी व संगणक परिचालक संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यासाठी आपण पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. नामदार महाजन व आमदार चव्हाण यांच्या आश्वासनानंतर संगणक परिचालक संघटनेने आपला मोर्चा स्थगित करत असल्याचे जाहीर केले व संगणक परिचालकांच्या मागण्यांची दखल घेत धावून आल्याबद्दल आमदार चव्हाण यांचे आभार मानले.

Previous Post

मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये बोनस !

Next Post

पाचोऱ्यात घरात कुणी नसताना वृद्धाला चाकूचा धाक दाखवीत ६ लाखांचा दरोडा !

Next Post

पाचोऱ्यात घरात कुणी नसताना वृद्धाला चाकूचा धाक दाखवीत ६ लाखांचा दरोडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group