नागपूर : वृत्तसंस्था
नागपूर येथे सुरु असलेले हिवाळी अधिवेशन विरोधक व सत्ताधाऱ्यामध्ये खडाजंगीमध्ये होत असतानाच आज धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात याची घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. दोन हेक्टरी प्रोत्साहनपर हा बोनस दिला जात आहे. शासनाच्या या घोषणाचा फायदा ५ लाख शेतकऱ्यांना होणार आहे.