मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील एका टीव्ही शोच्या सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आपले जीवनयात्रा संपविली होती. त्यानंतर या प्रकरणी तुनिषाच्या प्रकरणी शिझानला अटक करण्यात आली आहे. तसेच तो तिचा छळ करत होता, असे आरोपही करण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्यातील वसई येथे २४ डिसेंबर रोजी एका टीव्ही शोच्या सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आपले जीवन संपविले होते. याप्रकरणी अभिनेता शिझान याच्यावर तुनिषाला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. या घटनेनंतर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मृत तुनिषाच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, आज मी तुनिषा शर्माच्या आईशी अर्धा तास बोललो. मुलीच्या बाबतीत तिला न्याय हवा आहे. सखोल चौकशीनंतर न्याय दिला जाईल, असे आश्वासन आम्ही दिले आहे. मी उज्ज्वल निकम यांच्याशी बोललो आहे. उज्ज्वल निकम यांना या खटल्यात सरकारी वकील म्हणून आणावे. त्यासाठी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तुनिषाच्या आईने सांगितले की, तनिषा ही घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती. मी तनिषाच्या कुटुंबाला पक्षाच्या वतीने आर्थिक मदत करणार आहे. तसेच तुनिषाच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून २५ लाख रुपये देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं आठवले म्हणाले.