• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रसिद्ध अभिनेत्री रियाची पतीसमोर हत्या !

editor desk by editor desk
December 29, 2022
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
प्रसिद्ध अभिनेत्री रियाची पतीसमोर हत्या !

मुंबई : वृत्तसंस्था 

प्रसिद्ध अभिनेत्री रिया कुमारीची हत्या करण्यात आली आहे. मुळची झारखंडची असणाऱ्या रिया कुमारीचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील ती नेहमीच चर्चेत असते. तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.  या घटनेनं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ती पती प्रकाश कुमारसोबत प्रवास करत होती. दरम्यान काही अज्ञातांनी तिच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये तिचा मृत्यु झाला आहे.

रियाच्या पतीकडून बळजबरीनं पैसे घेण्यासाठी त्या गुंडांनी झटापट केल्याचे दिसून आले आहे.पतीला गुंड मारहाण करत असतानाच त्या हल्लेखोराची गोळी रियाला लागली आणि त्यात तिचा मृत्यु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एकीकडे प्रसिद्ध अभिनेत्री तुनिशा शर्माचे प्रकरण वादात असताना त्यानंतर घडलेल्या रियाच्या हत्याकांडानं पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. झारखंड मध्ये राहणारी रिया कुमारी ही एक अभिनेत्री असून ती लोकप्रिय युट्युबर देखील आहे.

पश्चिम बंगालच्या एका हायवेवर ही थरारक घटना घडली आहे. रिया कुमारी ही तिच्या पतीसोबत कारनं प्रवास करत होती. त्यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार अडवली. आणि त्यांनी रियाच्या पतीकडे पैशांची मागणी केली. यावेळी त्यांची बाचाबाची झाली. त्यांच्यातील वाढता वाद पाहून रियानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. गुंडांनी रियाच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना काही करुन पैसे हवे होते. नाहीतर ते जीवे मारण्याची धमकीही देत होते. त्याचवेळी रियानं पतीला वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता गुंडांनी तिच्यावर हल्ला केला. त्या गोळीबारात रिया जागीच ठार झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दीड वर्षाची मुलगीही कारमध्ये होती.

Previous Post

काय सांगता ! शिंदे गट घेणार शिवसेना भवन ताब्यात !

Next Post

अभिनेत्री तुनिषाच्या कुटुंबियांचही केद्रीय मंत्र्यांनी घेतली भेट ; मिळणार २५ लाखांची मदत !

Next Post
अभिनेत्री तुनिषाच्या कुटुंबियांचही केद्रीय मंत्र्यांनी घेतली भेट ; मिळणार २५ लाखांची मदत !

अभिनेत्री तुनिषाच्या कुटुंबियांचही केद्रीय मंत्र्यांनी घेतली भेट ; मिळणार २५ लाखांची मदत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group