अमळनेर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील नवलभाऊ कृषि महाविद्यालयातील प्राध्यापकांची महाविद्यालय प्रशासन आर्थिक शोषण करत असल्याचा अर्ज येथील एका प्राध्यापकांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी येथील कुलसचिव यांच्याकडे केला आहे.
दिलेल्या अर्जात म्हटले आहे कि, नवलभाऊ कृषि महाविद्यालय अंमळनेर जिल्हा जळगाव येथे सन 2011नंतर महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी येथील तज्ञ कमिटी मार्फत सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया नाही. सन 2011मधील भरती प्रक्रिया मधील दोन सहाय्यक प्राध्यापक फक्त आज सेवेत त्यांचे देखील विद्यापीठकडून approval मिळालेले नाही. कृषि विद्यापीठातील सक्षम अधिकारी व संस्थाचालक हे मिळून संगत मताने आर्थिक शोषण करीत आहेत. सन 2011पासून कुठलाही वेतन आयोग लागू न करता मनमानी पद्धतीने वेतन देत आहे. त्यामुळे आमचे जीवन जगणे असह्य झालेले आहे. सततचा मानसिक त्रास आर्थिक शोषण यामुळे जीवन नकोसे झालेले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठातील सक्षम अधिकारी पदाचा गैरवापर करून आमच्यावर अन्याय करीत आहेत. सातव्या वेतन अयोगप्रमाणे वेतन देणे कायद्याने बंधनकारक असून देखील हे संथाचालक वेतन देत नाही. ही बाब गंभीर आहे. कृपया हा संदेश सर्व महाराष्ट्रभर पसरविण्यात यावा. जेणेकरून पीडित सहाय्यक प्राध्यापकांना न्याय मिळण्यासाठी सहकार्य मिळेल अशा आशयाचे पत्र अमळनेरातील नवलभाऊ कृषि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक गिरीष सुकदेव पाटील यांनी दिले आहे.