जामनेर : प्रतिनिधी
शेतकऱ्यावर नेहमीच संकट येत असतात पावसाळ्यात निसर्गाचे संकट तर हिवाळ्यात चोरट्याचे संकट दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी चोरट्यांचे संकट मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आढळून येत आहे. जामनेर तालुक्यातील एका गावातील एका शेतकऱ्याचा कापूस व गहू याची चोरी केल्याची घटना उघडतेस आले आहे याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील गोरमाळा शिवारात शेती असलेले सुपडू संतोष पाटील यांच्या शेतातील पत्राच्या खोलीतून अनोळखी चोरट्यांनी खोलीचा कडी कोणाला तोडून खोलीत असलेले 17 क्विंटल कापूस व ७ हजार ५०० रुपये किमतीचा गहू असा एकूण १,३४,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे घटना दिनांक 28 रोजी उघडकीस आली आहे याप्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड हे करीत आहे.