जळगाव : प्रतिनिधी
ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या वेगळा गट स्थापन करून राज्यात सत्ता स्थापन केली त्यानंतर शिवसेना हि आमचीच म्हणत त्यांना बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाले व त्यानंतर त्यांनी आता राज्यभरात आपले जाळे तयार करीत असतांना जळगाव जिल्ह्यातील रखडलेली कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये शहरातील विविध आंदोलनात आक्रमक चेहरा असलेले निलेश पाटील यांना जिल्हाध्यक्षपदी तर सरिता माळी-कोल्हे यांना महिला जिल्हाप्रमुखपदी नियुक्त केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्यात शिंदे गटाने सत्तास्थापन झाल्यापासून जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. प्रतिक्षेत असलेली जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी आज दि.28 रोजी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय भाऊराव मोरे यांनी घोषित केली आहे. त्यामध्ये शिंदे गटाची जळगाव शहरासह ग्रामीण भागातील जिल्हाप्रमुखपदाची धुरा निलेश पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर जळगाव विधान सभा शहर संघटकपदी श्याम कोगटा, तर जळगाव शहराध्यक्षपदी गणेश सोनवणे, कुंदन काळे, तर वैद्यकिय आघाडी शहरप्रमुखपदी डॉ.खुशाल जावळे तर श्रीकांत शिंदे वैद्यकिय फाँडेशनच्या जिल्हाप्रमुखपदी जितेंद्र गवळी यांची तर महिला जिल्हा संपर्क प्रमुखपदी सरिता माळी-कोल्हे, महिला शहराध्यक्षपदी शोभा चौधरी व ज्योती शिवदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील शिंदे गटातील नेते व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.