धरणगाव : प्रतिनिधी
रेशनकार्डावर धान्य मिळत नसल्याची तक्रार घेऊन कल्पना चंदू पारधी नामक महिला तहसीलदार धरणगाव नितीनकुमार देवरे यांच्या केबिन मध्ये आली असता रेशनकार्डावर दुकानदार धान्य देत नसल्याची बाब तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून देताना सदर महिला अश्रू ढाळू लागली असता तहसीलदार यांनी तात्काळ पुरवठा निरीक्षक शेख यांना सूचना देत ऑनलाईन कार्ड झाले आहे का? अशी विचारणा केली.सदर कार्ड ऑनलाइन नसल्याने धान्य मिळत नसल्याची बाब श्री शेख यांनी सांगितली. सदर कार्ड तात्काळ ऑनलाइन करून यांचे दर महिन्याचे रेशन सुरू करा असा आदेशवजा सूचना तहसीलदार देवरे यांनी पुरवठा निरीक्षक यांना देऊ केल्या.
तसेच तहसिल कार्यालयातर्फे गरजुना देण्यात येणारे एका महिन्याचा किराणा उदरनिर्वाह किट ही देण्यात आले.
तहसीलदारांच्या या अनपेक्षित मदतीने या महिलेचे अश्रू अनावर झाले व त्यांनी मनोमन आभार मानले.
धरणगाव तालुक्यात बऱ्याचशा नागरिकांचे रेशनकार्ड ऑनलाईन नसल्याने त्यांचा धान्य कोटा उपलब्ध होत नाही,म्हणून दुकानदार धान्य देऊ शकत नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपले रेशनकार्ड ऑनलाईन करीन घ्यावे जेणेकरून धान्य मिळण्यास अडचण येणार नाही.तसेच केशरी रेशनकार्ड असेल व ते एनपीएच योजनेत असेल तर अशा नागरीकाना धान्य मिळत नाही त्यासाठी इष्टांक वाढ झाल्यावर त्यांना धान्य उपलबद्ध होते. गरजू नागरिकांना तहसिल कार्यालय अधिकारी व कर्मचारी यांचेकडून सहृदयी भेट म्हणून उदरनिर्वाह किट देण्यात येते.