नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील सिधरा येथे सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली, ज्यामध्ये तीन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले आहे. सिधरा भागातून दहशतवादी निघून गेल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाच्या पथकाने एक टीम तयार करून दहशतवाद्यांना घेराव घातला.
J&K | Visuals from Sidhra area of Jammu where an encounter took place.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/6EkijnUuyl
— ANI (@ANI) December 28, 2022
दहशतवादी ट्रकमधून नगरोटा येथे जात असताना सुरक्षा दलांनी त्यांना सिधरा पुलाजवळ अडवले. काही दिवसांपूर्वी याच परिसरात ग्रेनेड हल्लाही झाला होता. चकमकीमुळे सिधरा मार्गावर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले असता त्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यामध्ये तीन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले आहे.
आम्हाला एका ट्रकची असामान्य हालचाल दिसली आणि आम्ही त्याचा पाठलाग केला. जम्मूमधील सिध्रा येथे ट्रक थांबवण्यात आला आणि चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. ट्रकचा शोध घेतला असता आत लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्यात आला: एडीजीपी मुकेश सिंह यांनी ही माहिती दिली आहे.