जळगाव ;- जिथे कमी तिथे आम्ही म्हणजे भारत विकास परिषद आणि देवदूत यांनी कोविड काळात केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार खा. उन्मेष दादा पाटील यांनी आज केले. भारत विकास परिषद जळगाव शाखेतर्फे रूग्ण साहीत्याचे लोकार्पण व कोविड योध्दा सन्मान सोहळयात ते बोलत होते.
कोविड आपत्तीत आरोग्य क्षैत्रातून देवदूतच अवतरले होते. २४ तास घरदार सोडून, स्वताचा जिव धोक्यात घालून सेवा देणारे हया देवदूतांना सन्मानित करणे ही भाग्याची बाब असल्याचे बोलून भारत विकास परिषद जळगाव शाखेच्या कार्याबददल गौरव केला. डॉक्टरांना देवदूत का? म्हणतात हे कोविड आपत्तीतून लक्षात आले. डॉक्टरांवरील विश्वास कमी झाला होता आता तो वाढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारत विकास परिषद जळगाव शाखेतर्फे महेश प्रगती मंडळ सभाग्रूहात आयोजित रूग्ण साहीत्याचे लोकार्पण व कोविड योध्दा सन्मान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारत विकास परिषद राष्ट्रीय वित्त सचिव मा. संपतजी खुरदिया, राष्ट्रीय सचिव पश्चिम क्षेत्र मा. सुधिरजी पाठक, देवगिरी प्रातांध्यक्ष मा. गोपालजी होलाणी, जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे, जिल्हा जळगाव जि. रा.स्व. सघचालक डॉ. निलेशजी पाटील, के.के.कँन्सचे अध्यक्ष उद्योजक रजनीकांतजी कोठारी,भारत विकास परिषद जळगाव शाखाध्यक्ष उज्वल चौधरी, सेटलर तुषार तोतला इ मान्यवर उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. अध्यक्ष उज्ज्वल चौधरी यांनी भारत विकास परिषद कार्य विशद केले तर तुषार तोतला यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम उद्देश विशद केला.
हया डॉक्टर्स व देवदुतांचा झाला संन्मान
मान्यवरांच्या हस्ते कोविड काळात सेवा देणारे जळगाव शहरातील चेस्ट फिजीशियन डॉ. राहुल महाजन,डॉ सुदर्शन पाटील, डॉ धनराज चौधरी, डॉ कल्पेश गांधी, डॉ. मंदार पंडीत, डॉ. स्वप्नील चौधरी, डॉ. पराग चौधरी,डॉ. लिना पाटील, डॉ. मनोज टोके, डॉ तेजस राणे, डॉ. विलास भोळे, डॉ. पल्लवी राणे, डॉ कमलेश मराठे,डॉ प्रशांत अक्ष्रवाल यांचा यावेळी सन्मान केला. यांचेसह २४ डॉक्टर्स चा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याच बरोबर भोजन व्यवस्था करणारे अतुल तोतला, अतुल राका या परीवाराचा तसेच अंतिम संस्कार करणार्या विकास वाघ, मुकेश पाटील या यौध्या सोबत संपर्क फाऊंडेशन चे कर्मचारी वर्षा अहिरे, रेखा भारूळे, परविन खान, वंदना वानखेडे, सरला सोळंखे, आशा खाटीक, लक्ष्मी सैंदाणे, अमीत गवळी, योगेश सोळंखे, अक्षय चौधरी, मनोज चौधरी इ कर्मचारी वर्गाला मानचिन्ह देऊन कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
संपर्क फॉउंडेशन ही ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी नोेदणीकृत संस्था असून ३०/३५ सेवाव्रती रोज रूग्णांचे जिवन सुसहय करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून आता लोकार्पित झालेली रूग्णपयोगी साधने उपलब्ध होणार आहे. जळगाव शहरातील अनेक डॉक्टर आणि कोविड काळातील विलगीकरण केंद्र व कोविड रूग्णालयात सेवा देणा-या संपर्क फॉउंडेशनच्या सेवाव्रतींचा सन्मान भारत विकास परिषदेने केल्याने आभार मनोगतात व्यक्त केले. डॉ. कल्पेश गांधी, अभिषेक अग्रवाल, आनंद पलोड, सागर येवले यांनी कोविड काळातील आपले अनूभव विषद केले. या वेळी रुग्णपयोगी साहित्याचे लोकार्पण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम सूत्रसंचालन वैदेही नाखरे यांनी तर आभार डॉ. सुरेश अग्रवाल यांनी मानले. यशस्वी साठी भारत विकास जळगाव शाखा पदाधिकारी व कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.
प्रसिध्द उद्योजक रजनीकांतजी कोठारी यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करतांना देवदूतांनी केलेल्या कार्याला सलाम व्यक्त करीत शुभेच्छा दिल्यात
तर आ. राजू मामा भोळे यांनी भारत विकास परिषद व देवदूत हे कोविड काळात दिवसरात्र सेवा देत असल्याने जिल्हयातील रूग्णांना दिलासा मिळाला या देवदूतांमूळे हया आपत्तीला आपण खंबीरपणे तोंड देवू शकलो त्यांनी पुढील कार्यासाठी देवदूतांना शुभेच्छा व्यक्त केल्यात.