अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका २८ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या २८ वर्षीय विवाहितेला संशयित आरोपी गणेश गोकुळ अहिरे यांनी दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास विवाहितेच्या घराच्या मागील बाजूस जाऊन व विवाहितेस म्हणाला की तू मला खूप आवडते माझ्यासोबत चल असे बोलू लागला त्यावर विवाहितेने त्याला येथे येऊ नको नाहीतर मी माझ्या पतीला हे सर्व सांगेल याचा मनात राग आल्याने त्यांने विवाहितेशी अश्लील हा भाव करीत तुला व तुझ्या मुलीला घरी कुणी नसताना मारून टाकेल अशी धमकी दिली. याबाबत २८ वर्षे विवाहितेने अंमळनेर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी गणेश गोकुळ अहिरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोहेकॉ.सुनील जाधव हे करीत आहे.