• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बदलापूर आर्ट गॅलरीत जळगावमधील कलावंतांच्या गणेश कलाकृती

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 18, 2021
in जळगाव
0

जळगाव ;- ठाणे परिसरातील बदलापूरच्या प्रसिद्ध आर्ट गॅलरीमध्ये मान्यवर कलावंतांच्या सोबतीला जळगावच्या कलावंतांनी साकारलेल्या कलाकृती भाविकांना पाहता येत आहेत. जलरंग, ड्राय पेस्टल, अॅक्रलिक अशा विविध माध्यमांतून गॅलरीमध्ये 122 च्यावर गणेशाच्या कलाकृती अवतरल्या आहेत. यामध्ये वैविध्यपूर्ण, कलात्मक आणि कल्पक अशा पाच जळगावकरांच्या कलाकृतींचाही समावेश आहे.

चित्रकार आणि चित्रकला, शिल्पकलेला प्रोत्साहन देण्यासाठी बदलापूर आर्ट गॅलरीने हा उपक्रम राबविला आहे. गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातील अनेक दिवंगत, ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश करण्यात आल्याचे गॅलरीचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी सांगितले. कोल्हापूर येथील आबालाल रहेमान यांनी साकारलेले गणपतीचे चित्र ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्याकडून गॅलरीसाठी उपलब्ध झाले, ते चित्र या प्रदर्शनात आहे. तसेच बद्रीनारायण, संभाजी कदम, ग.ना.जाधव यासारख्या दिवंगत चित्रकारांनी रेखाटलेली सुबक चित्रे नव्या पिढीला कळावीत यासाठी या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. यासह ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, सुहास बहुलकर, श्रीकांत जाधव, विजयराज बोधनकर, प्रतिमा वैद्य, कैलास संन्याल या प्रसिद्ध कलावंतांच्याही कलाकृती यामध्ये आहेत. कलाक्षेत्रातील मान्यवरांसोबत जळगावमधील चित्रकार राजू बाविस्कर, शाम कुमावत, यशवंत गरूड यांच्यासह जैन इरिगेशनच्या आर्ट विभागातील चित्रकार विजय जैन, आनंद पाटील यांच्या वैविध्यपूर्ण, कलात्मक आणि कल्पक अशा कलाकृती बदलापूर आर्ट गॅलरीमध्ये अवतरल्या आहेत. जळगावमधील कलावंतांसाठी ही बाब भूषणावह आहे. मंगलमूर्तीच्या विविध रूपांच्या रंगरेषांच्या गणेश कलाकृतींचे प्रदर्शन दि.9 ते 25 सप्टेंबरपर्यंत पाहता येणार असून सायंकाळी 5 ते 9 यावेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.

 

Previous Post

पंतप्रधानाच्या वाढदिवसानिमित्त कोरोना लसीकरण

Next Post

भारत विकास परिषदचे कार्य कौतुकास्पद-खा. उन्मेष पाटील

Next Post
भारत विकास परिषदचे कार्य कौतुकास्पद-खा. उन्मेष पाटील

भारत विकास परिषदचे कार्य कौतुकास्पद-खा. उन्मेष पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group