एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, एरंडोल तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास फूस देत पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात इसमा विरोधात एरंडोल पोलिसात अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास एपीआय गणेश अहिरे हे करीत आहे.