Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दानवेंचे मोठे विधान : लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक !
    राजकारण

    दानवेंचे मोठे विधान : लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक !

    editor deskBy editor deskDecember 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    औरंगाबाद : वृत्तसंस्था 

    राज्यात हिवाळी अधिवेशनात विरोधक व सत्ताधाऱ्यामध्ये चढाओढ पाहायला मिळत असतांना दुसरीकडे भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या देखील निवडणुका होणार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात दानवे यांनी हे विधान केलं आहे.

    भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, हल्लीची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. सोबतच राजकीय घडामोडी होऊन इतर औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला आहे. दानवे यांचे या विधानाने राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून मध्याविधी निवडणूक लागण्याच्या चर्चा सुरू असतानाच दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

    दानवेंची फटकेबाजी…
    फुलंब्री येथे आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी जोरदार फटकेबाजी केली. आपल्या राजकीय करियर बद्दल बोलताना दानवेंनी अनेक किस्से सांगितले. मात्र, याच वेळी गावातील राजकारण याबद्दल नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना अनेक सल्लेही दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.