• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन ; मंत्र्याची हकालपट्टी करण्याची केली मागणी !

editor desk by editor desk
December 26, 2022
in राजकारण, राज्य
0
महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन ; मंत्र्याची हकालपट्टी करण्याची केली मागणी !

नागपूर : वृत्तसंस्था 

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा, अशी मागणी करत सोमवारी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. विधिमंडळ अधिवेशनात सोमवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेत अनिल परब यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप केले. याप्रकरणी सत्तारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश खुंटीला टांगून अब्दुल सत्तार यांनी मौजे गोडबाभूळ (ता. जि. वाशीम) येथील गट नंबर 44 मधील 37 एकर 19 गुंठे सरकारी गायरान जमिनीचे एका व्यक्तीला वाटप केले. या जमिनीची किमंत साधरणतः दीडशे कोटी रुपये आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही हा निर्णय अवैध पत्र 5 जुलै 2022 ला महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना लिहिले. सर्वोच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही याप्रकरणी ताशेरे ओढलेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेत अजित पवार आणि विधान परिषदेत अनिल परब यांनी केली. मंत्री अब्दुल सत्तार यांचायविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत वेलमध्ये उतरत जोरदार घोषणाबाजी केली. राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या… अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे… गायरान बेचनेवालों को जुते मारो सालों को… 50 खोके एकदम ओके… सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके… वसुली सरकार हाय हाय… श्रीखंड घ्या कुणी, कुणी भूखंड घ्या…अशा घोषणा यावेळी दिल्या. माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… राजीनामा द्या राजीनामा द्या , मुख्यमंत्री राजीनामा द्या… द्या खोके, भूखंड ओके… घेतले खोके माजलेत बोके… कर्नाटक सरकार हाय हाय… मिंधे सरकार हाय हाय… निर्लज्ज सरकार हाय हाय… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… गली गली मे शोर है खोके सरकार चोर है… संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे… धानाला भाव मिळालाच पाहिजे… अशा गगनभेदी घोषणा देत आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार घोषणाबाजी केली.

Previous Post

शहीद जवानांच्या वारसदारांना मिळणार सैन्यात नोकरी !

Next Post

खडसे परिवाराच्या अडचणीत वाढ ; या प्रकरणात लागली एसआयटी चौकशी !

Next Post
खडसे परिवाराच्या अडचणीत वाढ ; या प्रकरणात लागली एसआयटी चौकशी !

खडसे परिवाराच्या अडचणीत वाढ ; या प्रकरणात लागली एसआयटी चौकशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group